सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही

By अविनाश कोळी | Published: April 23, 2024 04:10 PM2024-04-23T16:10:16+5:302024-04-23T16:10:29+5:30

कौशल्यानुसार लाभार्थ्यांना काम देण्याची ग्वाही

Commissioner of Sangli Municipal Corporation sat on the ground and interacted with the homeless | सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही

सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी महापालिकेच्या सावली निवारा केंद्रास भेट देऊन येथील बेघरांशी संवाद साधला. याठिकाणी सेवा-सुविधांचा आढावा घेतानाच बेघरांना कौशल्यानुसार काम देण्याची ग्वाही दिली.

आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी केंद्रास भेट दिली. यावेळी निवारा केंद्रातील बेघर लोकांशी गुप्ता यांनी खाली जमिनीवर बसून संवाद साधला. अनेक शासकीय अधिकारी बऱ्याचदा उभ्या उभ्याच विभागांना भेट देतात किंवा केबिनमधील पाहुणचार घेऊन जातात. नव्या आयुक्तांनी बेघरांना जागेवरून न उठवता त्यांच्याजवळ बसून संवाद साधला. निवरा केंद्रात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी दिली.

बेघर केंद्रातील लाभार्थ्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्यांना काम उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. यावेळी ज्योती सरवदे, मतीन अमीन, मुस्तफा मुजावर उपस्थित होते.

Web Title: Commissioner of Sangli Municipal Corporation sat on the ground and interacted with the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली