‘ॲपेक्स’ प्रकरणाला आयुक्त, जिल्हा प्रशासनच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:04+5:302021-07-04T04:19:04+5:30
सांगली : मिरज येथील ॲपेक्स केअर रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूस डॉ. महेश जाधव याच्यासोबत आयुक्त व जिल्हा प्रशासनही तितकेच ...

‘ॲपेक्स’ प्रकरणाला आयुक्त, जिल्हा प्रशासनच जबाबदार
सांगली : मिरज येथील ॲपेक्स केअर रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूस डॉ. महेश जाधव याच्यासोबत आयुक्त व जिल्हा प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. कायदेशीर तरतुदी डावलून या रुग्णालयात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघर्ष समितीचे रवींद्र चव्हाण व तानाजी रुईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण व रुईकर यांनी सांगितले की, मिरजेचा आरोग्य पंढरी म्हणून नावलौकिक असताना डॉ. महेश जाधवने या प्रतिमेस काळिमा फासला आहे. रुग्णांचे जीव वाचविणारे रुग्णालय मृत्यूदार ठरत आहे. ॲपेक्स केअर रुग्णालयास देण्यात आलेली परवानगीच संशय निर्माण करणारी आहे. रुग्णालयात कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नसतानाही तेथे रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. याशिवाय महापालिकेने परवानगी रद्द केल्यानंतरही रुग्ण दाखल करून घेतले जात होते. महापालिका आयुक्तांनी कोणतीही शहानिशा न करता परवानगी दिली आहे. महापालिकेचे अधिकारी व डॉ. जाधव यांचे संबंध असल्यानेच ही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आयुक्त व जिल्हा प्रशासनही या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, या हेतूने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.