महादेववाडी येथे विविध विकासकामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:03+5:302021-02-10T04:26:03+5:30
पेठ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन युवा नेते प्रतीक ...

महादेववाडी येथे विविध विकासकामांना सुरुवात
पेठ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले. महादेववाडी (ता. वाळवा) येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिराळा तालुक्याचे युवा नेते विराज नाईक प्रमुख म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध ठिकाणी रस्ते, नाले यास ४३ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने बावीस लाख रुपये खर्च करून मराठी मुलांच्या शाळेत एलसीडी प्रोजेक्टर, काँक्रिटीकरण आणि आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील, रामचंद्र मोहिते, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विराज नाईक म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील आणि फत्तेसिंगराव नाईक यांनी आपल्या भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्यामुळे आज आपली प्रगती झालेली दिसते आहे. यावेळी प्रा. शामराव पाटील, वसंतराव कदम, आर. पी. मोहिते, नामदेव मोहिते, महादेव मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सविता गिरीगोसावी, उपसरपंच संभाजी कदम, बबन यादव, पोलीस पाटील अरविंद मोहिते, अरुण कदम, महादेव मोहिते, अमित नांगरे, रणजीत शिंदे, शंकर खोत, संजय काटे, राजाराम यादव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. रामभाऊ मोहिते यांनी आभार मानले.