स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:35+5:302021-05-23T04:26:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट योजनेंतर्गत प्रभागात सर्व्हे करण्याच्या कामाचा प्रारंभ शनिवारी ...

स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटच्या कामास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट योजनेंतर्गत प्रभागात सर्व्हे करण्याच्या कामाचा प्रारंभ शनिवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
दरवर्षी महापालिका क्षेत्रात सांगलीतील हनुमाननगर, शामरावनगर, भारतनगर, रामनगर, प्रगती कॉलनी, महसूल कॉलनी, विठ्ठल नगर, काळी वाट परिसर, आदी भागांत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठून राहते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने ८०० हेक्टर भागाचा सर्व्हे करण्यासाठी नियोजन केले आहे. या सर्व्हेमध्ये सर्व नैसर्गिक नाले व त्यांचा नैसर्गिक उतार, त्यानुसार पावसाच्या पाण्याचा निचरा, जमिनीची प्रत्यक्ष पातळी याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. हा सर्व्हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. योजनेचे सल्लागार संदीप गुरव व त्यांचे सहकारी हे काम करणार आहेत. कामाच्या प्रारंभावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, नगरसेवक अभिजित भोसले, शहर अभियंता संजय देसाई, शाखा अभियंता महेश मदने, अभिजित चव्हाण, आदी उपस्थित होते.