शिवपुरीत सिद्धेश्वर बंधारा दुरुस्ती कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:22+5:302021-03-13T04:48:22+5:30
शिवपुरी (ता. वाळवा) येथील सिद्धेश्वर बंधारा दुरुस्ती कामाचा प्रारंभ सुरेखा मोहन जाधव, सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात ...

शिवपुरीत सिद्धेश्वर बंधारा दुरुस्ती कामाचा प्रारंभ
शिवपुरी (ता. वाळवा) येथील सिद्धेश्वर बंधारा दुरुस्ती कामाचा प्रारंभ सुरेखा मोहन जाधव, सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सविता पाटील, मोहन जाधव, शहाजी पाटील, शिवपुरी गावचे सरपंच बाजीराव माने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : शिवपुरी (ता. वाळवा) येथील सिद्धेश्वर मंदिरानजीक असणाऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव यांच्या प्रयत्नामुळे सहा लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बंधाऱ्याच्या पाणी गळतीमुळे त्यामध्ये पाणी साठून राहत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा बंधारा दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे या सहा लाख ५० हजार रुपयांतून हा बंधारा दुरुस्ती करण्यात येणार आहे.
गुरुवारी या कामाचा प्रारंभ जि. प . सदस्या सुरेखा जाधव व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या सविता पाटील, उद्योजक मोहन जाधव, शहाजी पाटील, संग्राम गोईंगडे, महेश पोचे, शिवपुरी गावचे सरपंच बाजीराव माने, ग्रामपंचायत सदस्य, अरुण हुनुरके, ग्रामसेवक सागर मोकाशी, कॉन्ट्रॅक्टर महेश काटे, आण्णासाहेब कमाने, जगन्नाथ खोत, राजाराम खोत उपस्थित होते. पाणी गळती काढून बंधारा दुरुस्ती करण्यात येणार आहे.