पाईपद्वारे गॅससाठी सांगलीत ग्राहक नोंदणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:52+5:302020-12-13T04:39:52+5:30
सांगलीत नागरिकांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी ग्राहक नोंदणीचा प्रारंभ सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाला. यावेळी शेखर इनामदार, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने ...

पाईपद्वारे गॅससाठी सांगलीत ग्राहक नोंदणीला प्रारंभ
सांगलीत नागरिकांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी ग्राहक नोंदणीचा प्रारंभ सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाला. यावेळी शेखर इनामदार, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली, सातारा व कोल्हापुरातील नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. याअंतर्गत सांगली शहरातील नागरिकांना सीएनजी पुरवठ्यासाठी ग्राहक नोंदणीचा प्रारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाला.
भारत पेट्रोलियम कंपनीच्या भारत गॅस रिसोर्सेसतर्फे सांगली व सातारा जिल्ह्यांत घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरविला जाणार आहे. शिवाय दोन पंपांद्वारे वाहनांसाठीदेखील उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी सांगलीत दोन पंपांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. सांगलीत प्रभाक क्रमांक ८, ९, १०, १७ व १९ मध्ये ग्राहक नोंदणीचा प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० रुपये अनामत घेतली जाईल. त्यातून ग्राहकाच्या स्वयंपाकघरात किचन कट्ट्यापर्यंत गॅसवाहिनी टाकली जाईल. गाडगीळ म्हणाले की, गॅस प्रकल्पामुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ, स्वस्त व पर्यावरणपूरक इंधन मिळेल. नागरिकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. यावेळी नगरसेवक शेखर इनामदार, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी तसेच भारत गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौकट
स्वस्त व सुरक्षित गॅस
सध्या वापरल्या जाणाऱ्या बोजड गॅस सिलिंडरऐवजी पाईपद्वारे गॅस मिळणार असल्याने गृहिणींचा त्रास टळणार आहे. एलपीजीपेक्षा हलका असल्याने त्याचा स्फोट होत नाही, शिवाय एलपीजीपेक्षा ४० टक्के स्वस्तही आहे. प्रत्येक महिन्याला मीटरनुसार बिल दिले जाईल.
----------