नेर्ले येथे रस्ते डांबरीकरण कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:48+5:302021-03-17T04:26:48+5:30
नेर्ले (ता. वाळवा) येथे सजेॅराव देशमुख यांच्याहस्ते रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संजय पाटील, सरपंच छायाताई रोकडे ...

नेर्ले येथे रस्ते डांबरीकरण कामाचा प्रारंभ
नेर्ले (ता. वाळवा) येथे सजेॅराव देशमुख यांच्याहस्ते रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संजय पाटील, सरपंच छायाताई रोकडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे खासदार पी. चिदंबरम् यांच्या फंडातून रस्ते डांबरीकरण कामांचा प्रारंभ सर्जेराव देशमुख मजूर फेडरेशन सांगली यांच्याहस्ते व संजय पाटील अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, सरपंच छायाताई रोकडे, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब माने, य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष वसंतराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी गणपती मंदिर (घुमटामागून) ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, कदम गल्ली चौक ते नांगरेवाडा चौक व जालिंदर माने घर ते मच्छिंद्र माने घर या ३ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी संजय पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील विशेष प्रयत्नातून खासदार पी. चिदंबरम् यांच्या खासदार फंडातून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अनिल साळुंखे, राजाराम माळी, सविता माने, बापूराव बसवत, विजय पाटील, कृष्णाजी माने, प्रकाश कदम, हिरोजी पाटील, दत्ताबापू पाटील, रवींद्र जामदार, तानाजी गावडे, वसंत गडाळे, जगन्नाथ कदम, मदन कदम, जालिंदर माने, किशोर वेटम, बाळासाहेब रोकडे, अमोल पाटील, अरुण माने, नारायण रोकडे, संजय वंजारी, इंजिनियर चेतन रणखांबे, महेश पाटील, जयंत फाैंडेशनचे अध्यक्ष अमर शिंदे, दीपक पाटील, विशाल पाटील, किशोर पाटील, विनोद पाटील, कृष्णा खुडे, प्रशांत पाटील, योगेश गावडे, अजित खुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.