कामेरीत राम मंदिरासाठी निधी संकलनाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:29+5:302021-02-05T07:26:29+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी निधी संकलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री ...

Commencement of fund raising for Ram temple in Kameri | कामेरीत राम मंदिरासाठी निधी संकलनाचा प्रारंभ

कामेरीत राम मंदिरासाठी निधी संकलनाचा प्रारंभ

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी निधी संकलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री राम मंदिर निर्माण समितीचे वाळवा तालुकाप्रमुख मारुती जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाप्रमुख तुषार भूतकर. भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयराज पाटील यांची उपस्थिती हाेती.

प्रारंभी प्रभू राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कामेरीतील ग्रामस्थांनी निधी संकलनाला चांगला प्रतिसाद देत कार्यक्रमाच्या ठिकाणी राम मंदिरासाठी संयोजकांकडे निधी सुपुर्द केला. त्यानंतर स्थनिक युवा मोर्चा कार्यकर्ते व राम मंदिर समिती सदस्यांनी घरोघरी फिरून निधी संकलन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, माजी उपसरपंच धनाजी पाटील, रणजित पाटील, शशिकांत पाटील, दिलीप जाधव, अजित पाटील, शामराव पाटील, अरविंद खंडागळे, गुंडा माळी, सुमित जाधव उपस्थित होते.

फोटॊ : ३० कामेरी १

ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे किराणा दुकानदार संजय शहा यांनी राम मंदिरासाठी जयराज पाटील यांच्याकडे निधी दिला. यावेळी धनाजी पाटील, मारुती जाधव उपस्थित होते.

Web Title: Commencement of fund raising for Ram temple in Kameri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.