कुंडलमध्ये पूरसंरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:36+5:302021-06-11T04:18:36+5:30
पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील ओढ्यावर पूर संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आला. ...

कुंडलमध्ये पूरसंरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ
पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील ओढ्यावर पूर संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत होता. यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीमुळे या ओढ्याच्या कामासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मदतीने जिल्हा नियोजन समितीतून ८२ लाखांचा निधी या भिंतीसाठी दिला आहे.
आमदार लाड यांनी ठेकेदारांना काम चांगले आणि उत्कृष्ट दर्जाचे करण्याचे आदेश देऊन या भिंतीमुळे कुंडलच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, वसंतभाऊ लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, अनिल लाड, ग्रामसेवक श्रीधर कुलकर्णी, जे. पी. लाड, अशोक भिसे, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे, रणजित लाड, विक्रांत लाड, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, अर्जुन कुंभार, महारुद्र जंगम, हेमा पाकले, राजश्री लाड, कमलेश सोळवंडे, उज्ज्वला जाधव उपस्थित होते.