नेर्ले येथे विकासकामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST2021-03-20T04:25:01+5:302021-03-20T04:25:01+5:30

नेर्ले (ता. वाळवा) येथे मॉडेल स्कूलअंतर्गत शाळा नं. १ मध्ये देवराज पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ करण्यात आला. ...

Commencement of development work at Nerle | नेर्ले येथे विकासकामांचा प्रारंभ

नेर्ले येथे विकासकामांचा प्रारंभ

नेर्ले (ता. वाळवा) येथे मॉडेल स्कूलअंतर्गत शाळा नं. १ मध्ये देवराज पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संगीता पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने शाळा नं. १चे मॉडेल स्कूलअंतर्गत तीन वर्ग बांधणे, क्रीडांगण करणे, कंपाऊड भिंत व अंगणवाडी इमारत या कामांचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी माजी सरपंच संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, शुभम पाटील सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, सदस्य निवास माने, माणिक पाटील, सुयोग पाटील, अर्चना पाटील, शोभा पाटील, मनीषा जंगम, सदाशिव पाटील, जालिंदर पाटील, हणमंत माने, महेश पाटील, मुख्याध्यापक वासंती पाटील, अस्मिता शिंदे उपस्थित होते.

Web Title: Commencement of development work at Nerle