नेर्ले आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:55+5:302021-02-05T07:20:55+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविशिल्ड लस देण्याचा प्रारंभ वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील ...

नेर्ले आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविशिल्ड लस देण्याचा प्रारंभ वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील व आमदार मानसिंगराव नाईक, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्य सहायक ए. एस. साळुंखे यांना पहिली लस टोचण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नावनोंदणी करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अशा १६५ जणांना ही लस पहिल्या टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी दिली. याबरोबरच कासेगाव येथील २६४ व पेठ येथे १६८ जणांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, उपसभापती नेताजीराव पाटील, जि.प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जि. प. सदस्य संगीता पाटील, संध्याताई आनंदराव पाटील, सरपंच छाया ताई रोकडे, माजी सरपंच संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपसरपंच पाटील, पं. स. सदस्य शंकर चव्हाण, ‘कृष्णा’चे संचालक गिरीश पाटील, तलाठी पंडित चव्हाण, अधिकारी एम. डी. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, शरद बल्लाळ, विजय पाटील, अनिल साळुंखे, बाळासाहेब रोकडे उपस्थित होते.
फोटो -२५०१२०२१-आयएसएलएम-नेर्ले लसीकरण न्यूज
नेर्ले (ता. वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सभापती शुभांगी पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.