राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्याचे बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:12+5:302021-01-19T04:28:12+5:30

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्य विभागाकडील दूध उत्पादकांसाठी बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ आ. अमोल मेटकरी यांच्या ...

Commencement of bumper prize scheme of Krishna Animal Feed of Rajarambapu Dudh Sangh | राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्याचे बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ

राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्याचे बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्य विभागाकडील दूध उत्पादकांसाठी बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ आ. अमोल मेटकरी यांच्या हस्ते संघ कार्यस्थळावर पार पडला.

लोकनेते राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृष्णा पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यामध्ये एक कुपन देण्यात येणार आहे. याद्वारे लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला असून, यामध्ये टीव्हीएस पेप, हिरो एचएफ डिलक्स, बजाज सीटी १००, आदी प्रत्येकी एक दुचाकी, तर फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, वॉटर ॲक्वा यासह विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. दि. १७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीकरिता बंपर बक्षीस योजना आहे.

कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड, कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, सुहास पाटील, संघाचे संचालक विलासराव पाटील, उदय पाटील, रमेश पाटील, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी उपस्थित होते.

फोटो - १८०१२०२१-आयएसएलएम-कृष्णा बंपर न्यूज

राजारामबापू दूध संघाच्या बंपर बक्षीस योजनेचा प्रारंभ आ. अमोल मेटकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विनायकराव पाटील, शशिकांत पाटील, शरद लाड, आनंदराव पाटील, सुहास पाटील उपस्थित होते.

Web Title: Commencement of bumper prize scheme of Krishna Animal Feed of Rajarambapu Dudh Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.