शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
4
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
7
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

श्रवणबेळगोळमध्ये रंगांची उधळण; महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:13 PM

जगाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालू राहिलेला हा पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव ठरला

सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे १६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाचा समारोप सोहळा शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी पार पडला. जगाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालू राहिलेला हा पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव ठरला आहे. स्वतिश्री भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती महास्वामीजींच्या हस्ते रंगांची मुक्त उधळण करत महोत्सवाची सांगता झाली.माहिती महामस्तकाभिषेक सोहळा कमिटीचे राष्टÑीय सचिव, माजी महापौर सुरेश पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार बैठकीत याबद्दल माहिती दिली.राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते १६ फेब्रुवारीला या सोहळ्याचा प्रारंभ झाला होता, तर शुक्रवारी १४ सप्टेंबरला भक्तिभावाने अंतिम कलशाभिषेकाने महामस्तकाभिषेक झाला. आचार्य वर्धमानसागर यावेळी उपस्थित होते. महामस्तकाभिषेक सोहळा राष्टÑीय कमिटीच्या अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई) यांना अंतिम महामस्तकाभिषेकाचा मान मिळाला. त्यानंतर सतीश जैन यांना चंदन, केशर, दुग्धाभिषेकाचा मान मिळाला, तर विनोद बाकलीवाल यांना कल्कचूर्ण कलश, विनोद दोड्डनावर यांना सर्वोशधीकलश, सुरेश पाटीलयांना अष्टगंधकलश, कमल जैन यांना हळदकलश, अशोक सेठी यांना केशरी कलश, राकेश सेठी यांना शांतिधाराकलशाचा मान मिळाला.राष्टÑपती, पंतप्रधान, उपराष्टÑपती, गृहमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती. गेल्या सात महिन्यांत संस्कृत साहित्य संमेलन, विद्वत संमेलन, महिला संमेलनासह इतर विविध धार्मिक उपक्रम यावेळी पार पडले.दहा दिवसांच्या महामस्तकाभिषेकावेळी १ कोटींहून अधिक भविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता. दररोज ५ लाख लोकांचा अल्पोपहार व दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण देशभरातून १२०० टन शिधा संकलित झाला होता, अशी माहिती पाटील यांनी दिली. आता पुढील महामस्तकाभिषेक सोहळा २०३० मध्ये होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली