शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या बांधकामावर पाणी मारताना बसला विजेचा धक्का, युवकाचा जागीच मृत्यू; सांगलीतील जतमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:54 IST

महाविद्यालयाला सुटी असल्याने घरी आला असता घडली ही दुर्दैवी घटना

विठ्ठल ऐनापुरेजत : घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. संतोष आबासाहेब माने (रा. मानेवस्ती, जत) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.शहरापासून चार कि.मी. अंतरावर जत - सांगोला रोडलगत माने वस्ती आहे. याठिकाणी माने कुटुंबीय राहते. संतोष घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. वडील व शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी घटनेची माहिती जत पोलिस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिस पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मृत संतोष हा कवठेमहांकाळ शहरातील आय. टी. आय. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षामध्ये शिकत होता. सुटीचे दरम्यान तो घरी आला होता. दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या पश्चात आई -वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची जत पोलीस स्टेशन येथे नोंद झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटDeathमृत्यू