शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँक संचालकांचे सामूहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:02 IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले.

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न संचालकांनी केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही.

दिलिप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्‍य झाल्याचे कारण या राजीनामापत्रात दिले आहे. प्रत्यक्षात यामागे नोकरभरतीचे कारण असल्याची चर्चा आहे. नोकरभरतीत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, अशी भूमिका दिलिप पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढत आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी कालच त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातत्याने दिलीप पाटील यांना पाठबळ दिल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

  अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकरभरतीला प्रतिसाद नसल्याची संचालकांत जोरदार चर्चा आहे. राज्यातील पाच जिल्हा बॅंकांतील नोकरभरती केली. मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केल होते. नोकरभरतीची प्रक्रिया सुरु करु असे केवळ आश्‍वासन पाटील यांनी दिले होते. त्यातून असंतोष होता. अखेर काल रात्री एकाचवेळी राजीनामे देण्यात आले. 

दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सांगितले की, माझ्याकडे संचालकांचा लिफाफा आला आहे तो मी अजून फोडलेला नाही. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जयंत पाटील निर्णय घेतील - अध्यक्षबँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की राजीनाम्यांबद्दल मला काही माहित नाही. मी नेहमीच बँक हिताचे निर्णय घेतलेत. म्हणून बँक राज्यात क्रमांक एकवर आहे. मला जयंत पाटील यांनी अध्यक्ष केल्याने पदाबाबत तेच योग्य निर्णय घेतील.

टॅग्स :bankबँकSangliसांगलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र