इस्लामपुरातील राष्ट्रवादीत आता सामूहिक नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:45+5:302021-01-19T04:27:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मौन ...

इस्लामपुरातील राष्ट्रवादीत आता सामूहिक नेतृत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे. हे नेतृत्व तीन प्रमुख नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. शिवाय दोन-तीन जणांची सल्लागारपदी निवड होईल. मात्र, पाटील यांचे पुत्र प्रतीक त्यावर नियंत्रण ठेवतील, असे संकेत आहेत.
गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा निसटता पराभव जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. शहराचे नेतृत्व अॅड. चिमण डांगे यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती लांबणीवर पडली आहे. दरम्यान, डांगे यांची धनगर समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आगामी काळात शहरातील एकाकडे नेतृत्व न देता ते गटनेते संजय कोरे, अॅड. चिमण डांगे आणि शहाजीबापू पाटील यांच्याकडे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. सल्लागार म्हणून राजारामबापू सहकारी बॅँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष बी. ए. पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या सर्वांकडे पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात येण्याचे संकेत आहेत. युवा नेते प्रतीक पाटील हे सगळ्यावर नियंत्रण ठेवतील.
महाआघाडीत सत्ता आल्यानंतरच जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी शहरात प्रभागनिहाय बैठका घेऊन नागरिकांशी थेट संपर्क साधला आहे. या दाैऱ्यात प्रतीक पाटील यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली होती.
चौकट
एनए परिवारांत मनोमीलनाचे प्रयत्न
येथील एनए परिवारातील दुफळी महत्त्वाची घटना मानली जाते. ‘एनए’चे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आणि नगरसेवक खंडेराव जाधव यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. याची जबाबदारी संजय कोरे आणि शहाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
फोटो- १८०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर पालिका न्यूज (चार सिंगल फोटो)
प्रतीक पाटील, संजय कोरे, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील
पालिका लोगो