महापालिकेकडून एक टन प्लास्टिकचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:27+5:302021-08-24T04:30:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘स्वच्छता, संकल्प देश का’ या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असणारे आणि रस्त्यावरील सिंगल ...

महापालिकेकडून एक टन प्लास्टिकचे संकलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘स्वच्छता, संकल्प देश का’ या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असणारे आणि रस्त्यावरील सिंगल यूज प्लास्टिकचे संकलन हाती घेतले आहे. आतापर्यंत एक टन प्लास्टिक गोळा करण्यात आले असून, या प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक तयार केले जाणार आहेत.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०२१ महिन्यामध्ये रविवारी 'सिंगल यूज प्लास्टिकबंदी'साठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसर व व्यापारी क्षेत्रातील प्लास्टिक व्यावसायिक व नागरिकांचे प्रबोधन केले. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि त्यांच्या टीमकडून जमा केलेले सिंगल यूज प्लास्टिक पेव्हिंग ब्लॉक बनवण्यासाठी पाठवले.