शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई 

By संतोष भिसे | Updated: April 20, 2024 16:58 IST

बारावीपर्यंतच्या मराठासह सर्व विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश

सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापलेला असताना शासनाने राज्यभरात मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मराठा विद्यार्थ्यांच्या माहितीचे संकलन सुरु आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मराठा आणि इतर प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.निवडणुकीच्या कामाचे ओझे डोक्यावर असताना शिक्षकांना आता नव्याने माहितीचे संकलन करण्याची वेळ आली आहे. शासकीय, निमशासकीय,  अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, अल्पसंख्यांक व इतर सर्व प्रकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे. २०२२ - २३ आणि २०२३ - २४ या दोन शैक्षणिक वर्षांतील माहिती संकलित करुन सादर करायची आहे. त्या वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या, त्यात मराठा किती? अनुसुचित जातीचे किती? अनुसुचित जमातीचे किती? विमुक्त जातीचे, भटक्या जातीचे, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि मराठा व्यतिरिक्त इतर प्रवर्गातील विद्यार्थी अशी विस्तृत माहिती द्यायची आहे. यापैकी कोणत्या प्रवर्गाचे किती विद्यार्थी आणि किती विद्यार्थिनी पहिली ते दहावीदरम्यान शाळा सोडून गेले? याचाही तपशील पुरवायचा आहे.दहावी आणि बारावीमध्ये मराठासह विविध प्रवर्गातील किती मुले व मुली उत्तीर्ण झाले याचीही विचारणा करण्यात आली आहे. सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मराठासह अन्य प्रवर्गातील किती मुले शाळेबाहेर आहेत? हीदेखील विचारणा केली आहे.सध्या निवडणूक कामासाठी शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी, अधिकारी व शिक्षक नियुक्तीस घेण्यात आले आहेत. या धामधुमीतच ही माहिती देण्याचे फर्मान आले आहे. प्राथमिक शाळा स्तरावर सर्वच शाळांध्ये ही माहिती संगणकीकृत नाही. जेथे संगणकीकृत आहे, तेथे जातीनिहाय विश्लेषण करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षक हैराण झाले आहेत.

सरकारी कामाचा इरसाल नमुनाविद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालकांनी १८ मार्चरोजी पत्र जारी केले. त्यावर तीन आठवड्यांनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरु केली. सर्व गट शिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी माहिती पुरवावी असे पत्र १२ एप्रिलरोजी काढले.

ही माहिती १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुरवायची आहे अशी मखलाशीही केली. म्हणजे उपसंचालक सांगतात १८ मार्चरोजी, शिक्षणाधिकारी सांगतात १२ एप्रिलरोजी आणि माहिती देण्याची मुदत मात्र दोन महिन्यांपूर्वीची म्हणजे १४ फेब्रुवारीरोजीची आहे. या घोडचुकीची सुरुवात शिक्षण उपसंचालक कार्यालयात झाली. १८ मार्चला पत्र काढताना माहिती १२ फेब्रुवारीपर्यंत माहिती द्यावी असा विचित्र आदेश काढला. तारखेच्या गोंधळाची दखल न घेता शिक्षणाधिकाऱ्यांनीही चुकीच्या तारखेचे पत्र तसेच पुढे रेटले.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMaratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थी