कुपवाडमध्ये ८० पोती प्लास्टिक कचरा संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:19+5:302020-12-09T04:22:19+5:30

कुपवाड : शहरातील प्रभाग समिती तीनमधील वाॅर्ड नंबर १, २, ८ व ९ मधील आरोग्य विभागाचे अधिकारी, मुकादम, कर्मचाऱ्यांनी ...

Collection of 80 bags of plastic waste in Kupwad | कुपवाडमध्ये ८० पोती प्लास्टिक कचरा संकलन

कुपवाडमध्ये ८० पोती प्लास्टिक कचरा संकलन

कुपवाड : शहरातील प्रभाग समिती तीनमधील वाॅर्ड नंबर १, २, ८ व ९ मधील आरोग्य विभागाचे अधिकारी, मुकादम, कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक संकलन मोहीम राबविली. महापालिकेकडून चार वाॅर्डातून ८० पोती प्लास्टिक कचर्‍याचे संकलन करण्यात आले.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त सचिन पाटील यांच्या आदेशानुसार व आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व घनकचरा व्यवस्थापन या मोहिमेअंतर्गत शहरातील चारही वाॅर्डात प्लास्टिक संकलन मोहीम राबवून ८० पोती प्लास्टिक कचरा गोळा केला. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, अरविंद कुलकर्णी, सिध्दांत ठोकळे, विकास कांबळे, मुकादम, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

फोटो०८कुपवाड०४/ ओळ : कुपवाडमध्ये शहरातील महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ८० पोती प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले.

Web Title: Collection of 80 bags of plastic waste in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.