तासगावात शीतगृहाला आग; बेदाणा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:02+5:302021-07-09T04:18:02+5:30
तासगाव : तासगाव-सांगली रस्त्यावरील श्री कृपा शीतगृहाला (कोल्ड स्टोअरेज) गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत बेदाणा व ...

तासगावात शीतगृहाला आग; बेदाणा खाक
तासगाव : तासगाव-सांगली रस्त्यावरील श्री कृपा शीतगृहाला (कोल्ड स्टोअरेज) गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत बेदाणा व शीतकरण यंत्रणेसह बहुतांश साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
तासगाव-सांगली रस्त्यावर वासुंबे हद्दीत उमदी (ता. जत) येथील श्रीकृष्ण चंद्रकांत जाधव यांचे श्री कृपा कोल्ड शीतगृह आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता कामगार आल्यानंतर शीतगृहाला आग लागली असल्याचे लक्षात आले. तळभागातील पहिल्या चेंबरला आग लागली असल्याचे दिसून आले. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. तातडीने तासगाव नगरपलिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाडीला बोलावून घेण्यात आले. पालिकेच्या दोन अग्निशमन गाड्यांनी आग शमवण्याचे काम सुरू केले.
घटनास्थळी पोचताच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात आणण्यासाठी दिवसभर काम सुरू होते. शीतगृहाच्या भिंतींना जेसबीच्या सहाय्याने भगदाड पाडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने वाळवा, इस्लामपूर आणि विटा येथील अग्निशमन गाड्या मागविण्यात आल्या होत्या. आग नेमकी कशाने लागली, नेमके नुकसान किती झाले याची माहिती समजू शकली नाही.