प्रशिक्षक अमोल यादव यांची कुस्ती केंद्रास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:34+5:302021-06-16T04:35:34+5:30
बुधगाव : मुंबईच्या साई कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक अमोल यादव यांनी कवलापूर येथील उशांत क्रीडा मंडळ संचलित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच ...

प्रशिक्षक अमोल यादव यांची कुस्ती केंद्रास भेट
बुधगाव : मुंबईच्या साई कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक अमोल यादव यांनी कवलापूर येथील उशांत क्रीडा मंडळ संचलित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रास भेट दिली. उत्तमराव पाटील यांनी यादव यांचे केंद्रात स्वागत केले.
येथील कुस्तीपटूंना त्यांनी मार्गदर्शन करताना काही डावपेचही प्रात्यक्षिकांद्वारे शिकविले.
अमोल यादव मूळचे कडेपूरचे आहे. ते महाराष्ट्रातील सध्याचे अग्रेसर कुस्ती प्रशिक्षक आहेत. भारतातील निवडक कुस्तिपटूंना ते मुंबईत ‘साई’मध्ये प्रशिक्षण देणार आहेत. यापूर्वी ते सोनिपत (हरियाना) येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या शिबिरात मार्गदर्शक होते. जागतिक कुस्ती संघटनेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. कवलापूरच्पा उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रात तयार होत असलेल्या बहुउद्देशीय हाॅलसाठी दहा हजार रुपयांची मदत अमोल यादव यांचे वडील अशोकराव यांनी यावेळी दिली. यावेळी विलास यादव, सुधाकर केंचे (सोलापूर), दिनकरराव पवार (ऐतवडे खुर्द), मंडळाचे विश्वस्त दीपक पाटील, धोंडिराम हाक्के, अमोल पाटील, भक्ती कुंभार उपस्थित होते.
चौकट
औरंगाबादच्या शिरसाठ बंधूंची गुरूदक्षिणा!
यावेळी औरंगाबादचे जिल्हा सरकारी वकील सुरेश शिरसाठ, मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु श्याम शिरसाठ व प्रा. डाॅ. शेखर शिरसाठ या तीन बंधूंनी केंद्राला ५१ हजार रुपये देणगी दिली. या तीनही पैलवान बंधूंनी उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविले होते.