सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थकारणाचा कणा : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:12+5:302021-04-12T04:24:12+5:30
फोटो ओळ- बोरगाव (ता. वायवा) येथे यशवंत पतसंस्थेच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन केले. ...

सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थकारणाचा कणा : पाटील
फोटो ओळ- बोरगाव (ता. वायवा) येथे यशवंत पतसंस्थेच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : सहकारी पतसंस्था ग्रामीण जीवनाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे सहकार पतसंस्था सक्षम बनायला हव्यात. काही मुठभर व लोकांच्या बेजबाबदार वागण्याने पतसंस्था बदनाम होत आहे. ते थांबायला हवे, असे मत अशोक सावकरदादा उद्योग समूहाचे मार्गदर्शक धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.
यशवंत ग्रामीण पतसंस्थेच्या ३२व्या वार्षीक सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी अहवाल वाचन केले. सचीव सदानंद शिंदे यांनी नफा तोटा अंदाज पत्रक वाचन केले.
यावेळी शिवाजी वाटेगावकर, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, डॉ. शिवाजी पाटील, संभाजी पाटील, उद्धव शिंदे, मनीषा पाटील, संजीवनी पाटील, सर्जेराव घाडगे, दिनकर वाटेगावकर, दीपक चौधरी, संस्थेचे सदस्य, सल्लागार, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.