जिल्ह्यात उद्यापासून ढगांची दाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST2021-02-17T04:31:31+5:302021-02-17T04:31:31+5:30

सांगली : जिल्ह्यातील वातावरणात येत्या दोन दिवसांत बदल होणार असून ढगांची दाटी व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

Cloudy skies in the district from tomorrow | जिल्ह्यात उद्यापासून ढगांची दाटी

जिल्ह्यात उद्यापासून ढगांची दाटी

सांगली : जिल्ह्यातील वातावरणात येत्या दोन दिवसांत बदल होणार असून ढगांची दाटी व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. किमान तापमानातही अचानक वाढ झाल्याने बदलत्या वातावरणाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. येत्या सहा दिवसांतही असेच बदल हाेणार आहेत. १७ फेब्रुवारीस अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून १८ व १९ फेब्रुवारीस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. चालू सप्ताहात आता किमान तापमानात वाढ होत असल्याने ही थंडी कमी होणार आहे. दुसरीकडे कमाल तापमानातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी जिल्ह्याचे किमान तापमान १८, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. २२ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात अंशाने वाढ होणार आहे.

पावसाचे कारण काय

उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रवात तयार झाला असून, केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात १७ फेब्रुवारीस अवकाळी पावसाची चिन्हे आहेत.

Web Title: Cloudy skies in the district from tomorrow