तासगावात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST2021-03-27T04:28:29+5:302021-03-27T04:28:29+5:30

सांगली जिल्ह्याला निष्क्रिय शेतकरीसम्राट लाभल्याची टीका तासगावात काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न ...

Closed in Tasgaon | तासगावात बंद

तासगावात बंद

सांगली जिल्ह्याला निष्क्रिय शेतकरीसम्राट लाभल्याची टीका तासगावात काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केली.

तासगाव तालुका काँग्रेस व शिवसेना, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, दलित महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड या सर्व विरोधी पक्षांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा देत तासगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.

काँग्रेस भवनसमोर भाजप, राष्ट्रवादी वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केले. बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, अरुण खरमाटे, जयवंत माळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल कदम, माजी नगराध्यक्ष संजय पवार, शेतकरी कामगार पक्षाचे अर्जुन थोरात, शरद शेळके आदी उपस्थित होते.

फोटो

: केंद्र सरकारची धोरणे व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ तासगाव काँग्रेस भवनसमोर सर्व विरोधी पक्षांनी धरणे आंदोलन केले.

Web Title: Closed in Tasgaon