शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपक्षीय समितीसाठी कारखाने बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:52 IST

एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, आता राज्यातील साखर कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आपल्या हक्कासाठी आता तीव्र लढा दिला जाईल.

ठळक मुद्देकामगारांच्या मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वांगी / कडेगाव : राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावावा, अन्यथा राज्यातील साखर कारखाने बंद करू, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला.

वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, राज्य साखर कामगार महासंघ आणि जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्यावतीने कामगारांचा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते.

काळे म्हणाले की, त्रिपक्षीय समितीची मुदत ३१ मार्चला संपली. नवीन समिती स्थापण्याचा निर्णय प्रलंबित आहे. १५ डिसेंबरपर्यंत समिती स्थापन करून मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कारखान्यांची धुराडी बंद केली जातील. समितीचे कामकाज सुरळीत सुरू होईपर्यंत कामगारांना पाच हजार रुपये अंतरिम पगारवाढ द्यावी, साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरते काम करणाºया कामगारांना अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळावे, कामगारांचे थकीत वेतन मिळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी उभारावा, बंद पडलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, सेवानिवृत्त कामगारांना ७५०० रुपये पेन्शन मिळावी, या कामगारांच्या मागण्या आहेत.

एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, आता राज्यातील साखर कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आपल्या हक्कासाठी आता तीव्र लढा दिला जाईल. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.चंद्रकांत पवार यांनी स्वागत, प्रदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम, शशिकांत सांडगे, मंडळाचे कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे अध्यक्ष आनंदराव वायकर, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे खजिनदार रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष डी. बी. मोहिते, नितीन बेनकर, सयाजी कदम, संजय मोरबाळे उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने