हवामान बदलामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:13+5:302021-05-23T04:26:13+5:30
सांगली : सततच्या हवामान बदलामुळे सांगली शहरात सर्दी, तापाचे तसेच घशाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अशाप्रकारच्या रुग्णांचे ...

हवामान बदलामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढले
सांगली : सततच्या हवामान बदलामुळे सांगली शहरात सर्दी, तापाचे तसेच घशाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अशाप्रकारच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी ढगांची दाटी असे लहरी हवामान अनुभवास येत आहेत. तापमानातील चढ-उतारही सातत्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करीत आहेत. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धांना या बदलत्या हवामानाचा त्रास होत आहे. सर्दी, ताप, खोकला व घशाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
औषधोपचार घेताना संबंधित रुग्णांचा अँटिजन किंवा कोविडच्या अन्य तपासण्या करण्याकडेही कल वाढला आहे. यंदा मे महिन्यात एकाही आठवड्यात सलग तापमान स्थिर राहिले नाही. सतत हवामानात बदल झाले आहेत. याच महिन्यात किमान तापमानाचा उच्चांक व कमाल तापमानाचा नीचांक नोंदला गेला. चक्रीवादळानेही हवामानात बरेच बदल झाले. या सर्वांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. आणखी आठवडाभर नागरिकांना या बदलत्या हवामानाचा सामना करावा लागणार आहे.
कोट
हवामान बदलाचे परिणाम नागरिकांवर लगेच जाणवतात. गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप व घशाचे आजार दिसत आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता व परस्पर औषधे न घेता डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
- डॉ. तुषार पिड्डे, मिरज