चाणाक्ष चालींचा चक्रव्यूह; नामांकित खेळाडूंची आघाडी

By Admin | Updated: May 6, 2015 00:14 IST2015-05-05T21:39:56+5:302015-05-06T00:14:49+5:30

सांगली बुद्धिबळ महोत्सव : गाडगीळ, देशपांडे स्मृती स्पर्धेला प्रारंभ

Clever cyclone; Named players lead | चाणाक्ष चालींचा चक्रव्यूह; नामांकित खेळाडूंची आघाडी

चाणाक्ष चालींचा चक्रव्यूह; नामांकित खेळाडूंची आघाडी

सांगली : सांगली बुद्धिबळ महोत्सवात दोन नव्या स्पर्धांना मंगळवारी प्रारंभ झाला. श्रीमंत दादासाहेब गाडगीळ सोळा वर्षांखालील व लीलाताई देशपांडे दहा वर्षांखालील स्पर्धेला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली.उद्घाटन मुंबईच्या अपर्णा कालिदास बागूल व विनया विजय गोडबोले यांच्या हस्ते पटावरील चाल खेळून झाले. चिंतामणी लिमये यांनी स्वागत केले. यावेळी माधुरी आपटे, विजय आपटे, कुमार माने आदी उपस्थित होते. गाडगीळ स्मृती स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील छत्तीस खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीअखेर श्रीराज भोसले, मिहीर जोशी, श्रुती भोसले, प्रथमेश रजपूत, श्रुती गुरव, गायत्री रजपूत, मयूरी सावळकर, अभिनव गिनती, संकल्प पाटे, सोहम चाळके, प्रणव पाटील, देव छेडा, आदी खेळाडूंनी एका गुणासह आघाडी घेतली.देशपांडे स्मृती स्पर्धेत देशभरातील पंचावन्न खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीअखेर रूद्रप्रताप घाटगे, अर्थ डावरे, आयुष महाजन, श्रावणी पाटील, एम. सेवतीविजी, ईशान सोमय्या आदी खेळाडूंनी दोन गुणांची आघाडी घेतली. राष्ट्रीय पंच दीपक वायचळ, विकास भावे व करण परीट यांनी पंच म्हणून काम पाहिले. नूतन बुद्धिबळ मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बापट बाल शिक्षण मंदिरमध्ये या स्पर्धा सुरू आहेत.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Clever cyclone; Named players lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.