शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बहे येथील रामलिंग बेटावर वन विभागाची स्वच्छता मोहीम : कृष्णा नदीने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:29 IST

शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर सामाजिक वनीकरण व वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कृष्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. पूल ते राममंदिरपर्यंतचा रस्ता, मंदिर परिसर व नदीच्या दुतर्फा असणारा प्लॅस्टिक, कचरा बाहेर काढण्यात आला. युवा नेते प्रतीक पाटील यांनीही सहकाऱ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.इस्लामपूर परिक्षेत्राच्या ...

शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर सामाजिक वनीकरण व वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कृष्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. पूल ते राममंदिरपर्यंतचा रस्ता, मंदिर परिसर व नदीच्या दुतर्फा असणारा प्लॅस्टिक, कचरा बाहेर काढण्यात आला. युवा नेते प्रतीक पाटील यांनीही सहकाऱ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

इस्लामपूर परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी यांनी कृष्णाकाठावरील स्वच्छतेची मोहीम राबविण्याबाबत राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, सरपंच छायादेवी पाटील, उपसरपंच मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. पर्यटन व धार्मिक वारसा जपणाºया रामलिंग बेटाजवळ स्वच्छता करण्याचे निश्चित करण्यात आले.

पहिल्यादिवशी विभागीय वन अधिकारी व्ही. डी. जवळेकर, वन क्षेत्रपाल प्रियांका दळवी, सुप्रिया शिरगावे, वनपाल वसंत चव्हाण, सुप्रिया मदने यांच्या नेतृत्वाखाली सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

या हाकेला ओ देऊन बहे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, विविध संस्था यांच्यासह इस्लामपूरच्या महाराष्ट्र अ‍ॅकॅडमीचे संचालक अस्लम शिकलगार व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.रामलिंग बेट व कृष्णा नदी स्वच्छतेच्या वनीकरण विभागाच्या मोहिमेला प्रतिसाद देत दुसºया दिवशी युवा नेते प्रतीक जयंत पाटील, तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, ‘राजारामबापू’चे संचालक विठ्ठलराव पाटील, सुवर्णाताई पाटील, सरपंच छायाताई पाटील, उपसरपंच मनोज पाटील यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.बहे (ता. वाळवा) वन विभागाच्यावतीने दिलेल्या कचराकुंड्या प्रतीक पाटील यांच्याहस्ते छायादेवी पाटील व मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी सुप्रिया शिरगावे, संजय पाटील, प्रियांका दळवी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग