आष्टा येथील सोमलिंग तलाव परिसराची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:11+5:302021-03-13T04:50:11+5:30
आष्टा येथील सोमलिंग तलाव परिसराची बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेसह तिरंगा युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा ...

आष्टा येथील सोमलिंग तलाव परिसराची स्वच्छता
आष्टा येथील सोमलिंग तलाव परिसराची बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेसह तिरंगा युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : महाशिवरात्रीनिमित्त आष्टा येथील तिरंगा युवक मंडळ व बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या इतर संस्थांनी लोकसहभागातून सोमलिंग तलाव परिसराची स्वच्छता केली.
सोमलिंग तलाव आष्टा शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. ती झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चुन्याने रंगवलेले दगड ठेवल्याने रस्ता आकर्षक दिसत होता. तगारे प्रतिष्ठान, माजी सैनिक संघ, सेवानिवृत्त शिक्षक संघटना व बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या वतीने भाविकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक ठेवण्यात आले. सोमलिंग तलावातील पाणी कमी झाल्यानंतर परिसर स्वच्छ करून या ठिकाणी बगीच्या तयार करण्यात येणार आहे. सोमलिंग तलाव परिसर सुशोभित करण्यात येत असल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सुभाष तगारे, विक्रम भोपे, संग्राम शिंदे, अशोक मदने, प्रसाद देसाई, शहाजान जमादार, राजेंद्र मळणगावकर, भरत देसाई, सत्तार जमादार, डी. एस. कोळी, अब्बास लतिफ, अण्णासाहेब साळवाडे, जयपाल वाडकर, महादेव झांबरे आदी उपस्थित होते.
चौकट
शासकीय निधी मिळणार?
आष्टा येथील सोमलिंग तलाव विकासकामासाठी शासनाकडून सरोवर संवर्धन योजनेतून सुमारे दोन कोटी मंजूर झाले होते. हा निधी शासनाकडून मिळणार का ? व या परिसराचा कायापालट होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.