कासेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने नाले, गटारीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:34+5:302021-06-10T04:18:34+5:30
कासेगाव येथे नाले, गटारीची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने ...

कासेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने नाले, गटारीची स्वच्छता
कासेगाव येथे नाले, गटारीची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील नाले, गटारीची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ही मोहीम राबवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कासेगावमध्ये गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण गावातील गटारी, नाले स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी ही स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत राबवत असते. यावर्षी कामेरी येथील ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. गावातील एकूण ६ प्रभागांत ही स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, फिरोज अत्तार, सुरेश माने, ग्रामसेवक राहुल सातपुते आदी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करत आहेत.