आरळामध्ये शाळेच्यावतीने स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:05+5:302021-09-18T04:28:05+5:30

फोटो ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात मधुवंती धर्माधिकारी, ...

Cleaning campaign on behalf of the school in Arla | आरळामध्ये शाळेच्यावतीने स्वच्छता मोहीम

आरळामध्ये शाळेच्यावतीने स्वच्छता मोहीम

फोटो ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात मधुवंती धर्माधिकारी, प्रवीण कांबळे, मधुवंती धर्माधिकारी, मोहन पवार, लताराणी पाटील, जयाबाई कांबळे आदी सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : स्वच्छ भारत अभियान श्रमदान मोहिमेमुळे देश स्वच्छतेत बलवान होईल, असे प्रतिपादन आरळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण कांबळे यांनी केले.

आरळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर शाळेमार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान मोहीम कार्यक्रमात बोलत होते.

आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने स्वत:पासून स्वच्छतेची सवय लावून घेतल्यास भारत देश स्वच्छतेत अग्रेसर होईल.

यावेळी शाळा परिसर, शौचालये, समाजमंदिर व स्मशानभूमीत स्वच्छता करण्यात आली. मुख्याध्यापक मोहन पवार यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी जयाताई कांबळे, लताराणी पाटील, नेत्रा झाडे, अर्जुन झाडे, अभिजित कांबळे, आनंदा कांबळे, प्रियांका परूळे, रेश्मा झाडे, धैर्यशील झाडे आदी उपस्थित होते. मोहन पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Cleaning campaign on behalf of the school in Arla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.