आष्टा शहरात बहुरूपीच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:55+5:302020-12-11T04:53:55+5:30
आष्टा : आष्टा शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणच्या जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढविण्यात आली. शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पोलीस वेशातील बहुरूपींनी ...

आष्टा शहरात बहुरूपीच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण
आष्टा : आष्टा शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणच्या जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढविण्यात आली. शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पोलीस वेशातील बहुरूपींनी जनजागृती केली.
गतवर्षी आष्टा शहराचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर ३२ वा क्रमांक आला होता. यावर्षीही शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यावर्षी घरोघरी जाऊन पोलीस बहुरूपी विनोदी स्वरूपात लोकांना स्वच्छता ठेवण्याचे संदेश देत आहेत. बहुरूपींच्या माध्यमातून शहरातील लोकवस्ती आणि व्यापारी क्षेत्रातील सर्व ठिकाणी जोरदार जनजागृती सुरू आहे. लोकांना ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीमध्ये टाकणे, व्यापारी क्षेत्रात निर्माण होणारा कचरा संध्याकाळी येणाऱ्या घंटागाडीत टाकणे, अशा गोष्टींबाबत जनजागृती होत आहे.
शहरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिला. नगरपरिषद प्रशासन आष्टा शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी कटिबद्ध आहे. या बहुरुपींना सौ. आसावरी सुतार आणि स्वच्छता समन्वयक प्रणव महाजन मार्गदर्शन करीत आहेत.
फोटो -10122020-Islm-Ashta Bahrupi news
फोटो ओळ : आष्टा पालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्याबाबत बहुरूपी यांना संधी देण्यात येत आहे.