सांगलीत कैद्याचा ‘सिव्हिल’मध्ये मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2014 01:21 IST2014-05-27T01:10:46+5:302014-05-27T01:21:47+5:30

सामूहिक बलात्कार करून युवतीचा खून केल्याचा आरोप

Civilian prisoner dies in 'civil' | सांगलीत कैद्याचा ‘सिव्हिल’मध्ये मृत्यू

सांगलीत कैद्याचा ‘सिव्हिल’मध्ये मृत्यू

 सांगली : सामूहिक बलात्कार करून युवतीचा खून केल्याचा आरोप असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सागर नंदकुमार हत्तेकर (वय २७, रा. कुंडल, ता. पलूस) या कैद्याचा आज (सोमवार) सकाळी मृत्यू झाला. सागरचा मृत्यू संशयास्पद असून, याची चौकशी करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली. आॅक्टोबर २००२ मध्ये विट्यातील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी सागरसह चौघांना अटक करण्यात आली होती. सागर २९ आॅक्टोबर २०१२ पासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. गेले वर्षभर तो फुफ्फुसात पाणी झाल्याने, रक्तदाब व हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होता. रविवारी रात्री त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. कारागृह प्रशासनाने साडेबारा वाजता त्यास उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवले होते. उपचार सुरू असताना सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Civilian prisoner dies in 'civil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.