शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

शहरातील पोलीस, सरकारी बाबूंनाही टोळीचा गंडा!

By admin | Updated: January 13, 2015 00:08 IST

यंत्रणेत दोष : खरेदी-विक्रीच्या नोंदींना होत असलेला विलंब लॅण्डमाफियांच्या पथ्यावर

सचिन लाड - सांगली -महापालिका क्षेत्रात गुंठेवारीतील प्लॉट हडप करणाऱ्या टोळ्यांनी पोलीस कर्मचारी, तसेच विविध शासकीय कार्यालयातील सरकारी बाबूंनाही प्लॉट विक्रीच्या माध्यमातून गंडा घातल्याची प्रकरणे समोर आली आहेत. प्लॉट खरेदीची नगरभूमापन व तलाठी कार्यालयात नोंद करण्यास तीन-तीन महिन्यांचा कालावधी लावला जात आहे. त्यामुळे ‘लॅण्डमाफिया’ टोळ्या या काळात त्या प्लॉटची पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विक्री करीत आहेत. सांगली, मिरज व कुपवाड येथे पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांनी १९८५ ते २००० या काळात स्वत:चे घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी केले आहेत. भविष्यात कर्ज काढून बांधकाम करायचे, असे त्यांनी ठरविले होते. कर्ज मिळाल्यानंतर ते प्लॉटवर गेल्यानंतर तिथे दुसऱ्याच व्यक्तीचे अतिक्रमण दिसून आले आहे. तलाठी कार्यालयात चौकशी केल्यानंतर, या प्लॉटचा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर सात-बारा उतारा निघत आहे. महावितरणचे कनेक्शन घेतल्याची दुसऱ्या व्यक्तीची नोंद निघत आहे. पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली, तर ते जागा विकत घेतल्याचे सांगून, खरेदीची कागदपत्रेही दाखवत आहेत.फसवणूक झालेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्कासाठी झगडावे लागत आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी तक्रारीची दखल घेत नाहीत. पोलिसांनी प्लॉट बळकाविल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित लॅण्डमाफिया वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरण दाबण्याचा सल्ला देतात. यासाठी तडजोडी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: मिरजेत लॅण्डमाफियांची टोळी पोलीस ठाण्यासमोर बसूनच असते. कोणी तक्रार केली, तर ते अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. तक्रारदाराला गाठून, ‘तक्रार मागे घे, नाही तर तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवितो’, अशी धमकी देतात. यासाठी त्यांनी काही महिलांना हाताशी धरले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्यापर्यंत लॅण्डमाफियांच्या तक्रारी काही महिन्यांपूर्वी गेल्या होत्या. त्यांनी गुंडाविरोधी पथक व संबंधित पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी ही प्रकरणे दिली होती. मात्र चौकशीच झाली नाही. उलट तक्रारदार पोलिसांनाच ‘तुमच्याकडून कायदा व सुव्यस्थेचा भंग होऊ शकतो, तसे झाल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, अशी नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस नोकरीला घाबरून शांत बसले आहेत.लॅण्डमाफियांचे तलाठी व नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांशीही साटेलोटे आहे. एखाद्या व्यक्तीला त्यांनी प्लॉट विकला तर, त्या व्यक्तीची तलाठी अथवा भूमापन कार्यालयात लगेच नोंद होणे गरजेचे आहे. खरेदीदार कागदपत्रे घेऊन नोंदीसाठी जातात. तेथील अधिकारी कागदपत्रे ठेवून घेतात. चार-आठ दिवसात काम होईल, असे सांगतात; मात्र प्रत्यक्षात ते तीन-तीन महिने नोंद करीत नाहीत. याची संधी साधून लॅण्डमाफिया हाच प्लॉट अन्य एका व्यक्तीस विकतात. यंत्रणेतील या दोषामुळे एकच प्लॉट तीन लोकांना विकला जात आहे. मात्र हे तीनही लोक मालक होत नाहीत. मीच मालक आहे, असा ते दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात प्लॉट, सात-बारा उतारा चौथ्या व्यक्तीच्या नावावर निघत आहे.