इस्लामपूर येथे नागरिकांना विविध योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:07+5:302021-02-15T04:24:07+5:30

इस्लामपूर : येथील बालाजी ग्रुपच्या वतीने घेतलेल्या शिबिरात एक हजारहून अधिक नागरिकांना आयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिटकार्ड योजना, आधारकार्ड ...

Citizens benefit from various schemes at Islampur | इस्लामपूर येथे नागरिकांना विविध योजनांचा लाभ

इस्लामपूर येथे नागरिकांना विविध योजनांचा लाभ

इस्लामपूर : येथील बालाजी ग्रुपच्या वतीने घेतलेल्या शिबिरात एक हजारहून अधिक नागरिकांना आयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिटकार्ड योजना, आधारकार्ड दुरुस्ती अशा सुविधा उपलब्ध करून देत त्यांना या योजनांचा लाभ देण्यात आला. बालाजी ग्रुपचे प्रमुख, उद्योजक बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर कौतुकास्पद आहे, अशी भावना प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, भगवानराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, नगरसेवक खंडेराव जाधव, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, बालाजी पाटील, संदीप माने, प्रवीण पाटील, सचिन ताटे, वसंत ताटे, प्रवीण कुरळपकर, शिवाजी कदम, मनीष जाधव, आनंद तांदळे, रणजित जाधव, स्वरूप मोरे, अमोल वीरकर उपस्थित होते.

फोटो - १४०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज

इस्लामपूर येथे बालाजी ग्रुपने आयोजित केलेल्या शिबिरात प्रतीक पाटील यांच्या हस्ते आधारकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कोळेकर, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, धैर्यशील पाटील, आनंदराव मलगुंडे, भगवानराव पाटील, संदीप माने, शिवाजी कदम उपस्थित होते.

Web Title: Citizens benefit from various schemes at Islampur