नागरिकहो..! तोतया अधिकाऱ्यांपासून रहा सावधान!

By Admin | Updated: March 30, 2015 00:12 IST2015-03-29T23:42:13+5:302015-03-30T00:12:34+5:30

पोलीस चक्रावले : नागरिकांमधील भीतीचा गुन्हेगारांना फायदा, सतर्कता बाळगणे गरजेचे::लोकमत विशेष

Citizens ..! Be careful from the discreet officers! | नागरिकहो..! तोतया अधिकाऱ्यांपासून रहा सावधान!

नागरिकहो..! तोतया अधिकाऱ्यांपासून रहा सावधान!

सचिन लाड : सांगली ::शासकीय अधिकारी, आयकर अधिकारी, पोलीस अधिकारी, रॉ. अधिकारी अशा विविध पदांचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा घटनांमध्ये सुशिक्षित व्यक्तींचीही फसगत होताना दिसते. भीती न बाळगता सतर्कतेने पावले उचलली गेली तर तोतयागिरी करण्यांवर सामान्य नागरिकही मात करू शकतो. अशा लोकांना गजाआड करण्यासाठी केवळ सतर्कताच उपयोगी येऊ शकते. मिरजेत शनिवारी आयकर अधिकारी असल्याचे भासवून झालेली लुटीची घटना नागरिकांना धक्का देऊन गेली. आपलीही अशी फसगत होऊ शकते, अशी खात्री बळावत असली तरी, सतर्कतेच्या माध्यमातून अशा तोतयागिरीला आळा घातला जाऊ शकतो.


तोतया आयकर अधिकारी असल्याचे सांगून मिरजेत बारा लाखांचा ऐवज लूटल्याचा प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. पोलिसांबरोबरच नागरिकांनाही या घटनेने धक्का बसला आहे. आपल्याबाबतीतही असा प्रकार होईल का, अशी भीती व्यक्त होत आहे. तोतया अधिकाऱ्याला ओळखपत्र विचारले तर तो ओळखपत्रही बोगस करून दाखवू शकतो. त्यामुळे अशावेळी काय करायचे, असा प्रश्नही सामान्य नागरिकांना पडू शकतो. पोलिस, तज्ज्ञ अधिकारी यांच्या मताप्रमाणे अशा तोतयागिरीला नागरिकांची थोडीशी सावधानताही अडचणीत आणू शकते. असा छापा पडला, असे लोक घरी आले तरी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे समजले आणि त्याचा वापर केला की अशा घटनांना आपोआपच आळा बसू शकतो.



नागरिकांनी काय करावे!
पोलीस अथवा अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयाचे नाव सांगून कोणी घरी आल्यास त्याच्याकडे सखोल चौकशी करावी.
ओळखपत्र जरी त्याने दाखविले तरी संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करावी.
इंटरनेटवर अनेक शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व मोबाईल क्रमांक आहेत, त्याची यादी जवळ ठेवावी.
ओळखपत्र जरी दाखविले तरी त्यावरील नाव, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमाकांची खात्री करावी.
जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यास आरडाओरड करून शेजारीला लोकांना सावध करावे.

Web Title: Citizens ..! Be careful from the discreet officers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.