शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील जतमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, डोक्यात दगड घालून केला खून

By श्रीनिवास नागे | Updated: March 17, 2023 15:49 IST

नेमकी हत्या कोणी व का केली याबाबत जत पोलिस तपास करीत आहेत

जत : जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय ४२, रा. जत) यांचा भरदिवसा गोळ्या घालून आणि थरारक पाठलागानंतर डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास सिनेस्टाईलने हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर फरार असून, खुनाचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्हाभर खळबळ माजली आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील कोसारी गावी दोघांचा अशाच पद्धतीने भरदिवसा खून करण्यात आला होता.विजय ताड शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दिवंगत शिवाजीराव ताड यांचे पुत्र आहेत. दुपारी दीडच्या सुमारास ते मोटारीने घराजवळ असलेल्या अल्फोन्सा स्कूलमध्ये मुलांना आणण्यासाठी निघाले होते. शेगाव रस्त्यावरील शाळेजवळ वळत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. मोटारीला सेन्सॉर असल्यामुळे ती जागीच बंद पडली. त्यामुळे ताड यांनी मोटार सोडून जीव वाचविण्यासाठी घराकडे मधल्या रस्त्याने धाव घेतली.

शाळेच्या पाठीमागच्या बाजूने पळत असताना हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतर ते जमिनीवर पडले. जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. हल्लेखोरांची संख्या पाच असल्याची चर्चा घटनास्थळी होती.नगरसेवक ताड यांना राजकीय वारसा असल्यामुळे जत शहरातील व तालुक्यातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथेही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन, अत्याधुनिक इन कॅमेरा, फॉरेन्सिक लॅब टेस्टसाठी व विच्छेदनासाठी मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयाकडे हलविण्यात आला.दरम्यान, घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयास वरिष्ठ पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात येऊन घटनेबाबत माहिती घेतली व पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. हल्लेखोर फरार असून, खुनाचे कारण समजू शकले नाही.ते म्हणाले की, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. अद्याप संशयित निष्पन्न झाले नसून, संशयितांच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.पाठीत दोन गोळ्या घुसल्यापोलिसांना घटनास्थळी पिस्तुलाच्या तीन पुंगळ्या सापडल्या असून, मृत विजय ताड यांच्या पाठीत दोन गोळ्या घुसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस