शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

दारूड्या तलाठ्याचा चोरोचीत धिंगाणा

By admin | Updated: December 3, 2015 00:50 IST

कार्यालयावर दगडफेक : कोतवालासह ग्रामस्थांना शिवीगाळ

कवठेमहांकाळ : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) गावात बुधवारी तळीराम तलाठ्याने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. तलाठी कार्यालयावर दगड फेकले आणि दरवाजाची मोडतोड केली. महाराष्ट्र सरकार दारूबंदी का करीत नाही, असा उलट सवाल करीत महिनाभर कामावर हजर करून न घेतल्याबद्दल खुलेआम हातात दारूची बाटली घेऊन दारू पित धिंगाणा घातला. कोतवालासह ग्रामस्थांना शिवीगाळ केली. कांतिलाल पितांबर साळुंखे असे त्याचे नाव असून, तो मूळचा येळवी (ता. जत) येथील आहे. कांतिलाल साळुंखे याची एक महिन्यांपूर्वी चोरोची येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली आहे; परंतु अद्याप त्याला हजर करून घेतलेले नाही. तो मद्यपी असल्याची माहिती आधीच लागल्याने त्याची नियुक्ती रद्द करावी, असे पत्र ग्रामस्थांनी आमदार सुमनताई पाटील यांना दिले आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता साळुंखे चोरोचीच्या तलाठी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी तो दारूच्या नशेतच होता. त्याने तलाठी कार्यालयावर दगड फेकले, तसेच दारावर लाथाही मारल्या. तलाठी कार्यालयात प्रवेश करून तेथे कामासाठी आलेल्या ग्रामस्थांशी हुज्जत घालण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु दारूच्या नशेत बेभान झालेल्या साळुंखे याने गावाच्या पारावरच सभा सुरू केली. ‘अण्णासाहेब, तुम्ही कामावर असताना दारू का पिता? तुम्हाला कोणी परवानगी दिली?’ असा सवाल ग्रामस्थांनी करताच ‘मला एम.डी. पदवी असलेल्या डॉक्टरांनीच दारू पिण्याची परवानगी दिली आहे. डॉक्टरच सांगतात, तुमच्या शरीराला अल्कोहोलची गरज आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच मी दारू पितो,’ अशी गमतीशीर उत्तरे त्याने दिली. ‘तुम्ही दारू पिल्याबद्दल शासनाला किंवा महसूलमंत्री एकनाथ खडसेंना सांगितले तर तुमची चौकशी होईल,’ असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर त्याने कहरच केला. ‘दारू कोणाची? शासनाची! ‘सरकारमान्य दारूचे दुकान’, असे दुकानावरच लिहिलेले असते, म्हणूनच मी दारू पितो. महसूलमंत्र्यांना माझा एक प्रश्न आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मग महाराष्ट्रात का होत नाही? एक हजार कोटींचा महसूल बुडतो म्हणून महाराष्ट्रात दारूबंदी होत नाही,’ अशी मुक्ताफळे त्याने उधळली. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडले नाही. ‘नरेंद्र मोदींना मी विनंती करतो. त्यांनी गुजरातमध्ये दारूबंदी केली, महाराष्ट्रात का नाही’, असा सवाल पंतप्रधानांना केला. ‘वरिष्ठांना कळवितो’, असे सांगताच,‘कळवा की! गेले चार महिने मला चार्ज दिला नाही. मी तहसीलदार डोंगरेलाही बोललो व नायब तहसीलदारालाही बोललो, तरीही मला चार्ज दिला नाही. मग, मी दारू पिणार नाही तर काय करणार?’, असा उलट प्रश्नही त्याने केला. त्यानंतर ‘जास्त’ झाल्याने त्याने तेथेच बसकण मारली. सायंकाळपर्यंत तो रस्त्याकडेला पडून होता. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. (वार्ताहर)