इस्लामपुरात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून चिमुरडा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:13+5:302021-02-14T04:25:13+5:30

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दोन वर्षीय चिमुरड्याचा जागीच अंत झाला. ...

Chimurda found under the wheel of a trolley in Islampur and killed | इस्लामपुरात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून चिमुरडा ठार

इस्लामपुरात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून चिमुरडा ठार

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून दोन वर्षीय चिमुरड्याचा जागीच अंत झाला. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सार्थक कविदास पवार असे या ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याबाबत कविदास यशवंत पवार (वय ३२, मूळ रा. दुधणी, अक्कोलकोट-सोलापूर. सध्या-तुजारपूर रस्ता, लमाण तांडा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर नुरा पवार (विनायकनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कविदास आणि त्याची पत्नी मुलगा सार्थक याला घेऊन रस्ते कामावर सकाळी ९ वाजता आले होते. तेथे दोघे रस्त्याच्या बाजूला माती टाकण्याचे काम करत होते. यावेळी तेथे उभा असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीजवळ सार्थक हा खेळत होता. चालक मधुकर पवार हा तेथे आला. त्याने ट्रॅक्टर सुरू करून पाठीमागे घेतल्यावर खेळत असणारा सार्थक चाकाखाली सापडला. चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. काम करत असलेल्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. दोघांनीही हंबरडा फोडल्याने इतर मजूर जमा झाले. मात्र, त्यापूर्वीच सार्थकची प्राणज्योत मालवली होती. घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

Web Title: Chimurda found under the wheel of a trolley in Islampur and killed