शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्र्यासह पाळणा उडाला ; मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:00 IST

अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला. पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते.

ठळक मुद्देपण रात्री साडेअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कवठेएकंद : मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वा-याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मतकुणकीतील कवठेएकंद-चिंचणी रस्त्यानजीक विश्वनाथ शिरतोडे पत्नी, मुलगा, सून व तीन नाती यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा संजय यांना चार महिन्यांपूर्वी नंदिनी ही तिसरी मुलगी झाली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वारे सुटले. त्यावेळी सर्वजण घरात होते. मात्र काही कळण्याच्या आतच जोरदार वारे घरात शिरले आणि घराचा पत्रा वाºयासह उडून गेला. या पत्र्याच्या अँगलला दोरीने पाळणा बांधला होता. पाळण्यात नंदिनी होती. अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला. पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण रात्री साडेअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी घटनास्थळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, मंडल अधिकारी प्रवीण माळवे, तलाठी लोणकर, सरपंच नेताजी पाटील, सर्जेराव पाटील, शिराज मुजावर आदींनी भेट दिली.आईचा आक्रोशवारे सुरू झाले तेव्हा चिमुकल्या नंदिनीला तिची आई नीता आपल्याकडे घेणार होती. तोपर्यंत वारे घरात घुसून काही कळण्याअगोदरच अँगल व छतासह पाळणा उडून गेला. छताखाली पाळणा दबला जाऊन चिमुकलीचा अंत झाला. घटनास्थळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घरामध्ये सगळे असतानाही वादळापुढे हतबल व्हावे लागले आणि क्षणात चिमुकलीला गमवावे लागले. 

 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस