चिमण डांगे यांचा खरातवाडीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST2020-12-05T05:10:55+5:302020-12-05T05:10:55+5:30

इस्लामपूर : इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. चिमण डांगे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या ...

Chiman Dange felicitated at Kharatwadi | चिमण डांगे यांचा खरातवाडीत सत्कार

चिमण डांगे यांचा खरातवाडीत सत्कार

इस्लामपूर : इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. चिमण डांगे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खरातवाडी (ता. वाळवा) ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच अविनाश खरात, रामचंद्र खरात, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास खरात, सरपंच पृथ्वीराज खरात, बहे सोसायटीचे अध्यक्ष शंकर खरात, उपसरपंच विष्णू खरात, अहिल्यादेवी होळकर दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ खरात, बाबासाहेब मदने, शशिकांत दगडे उपस्थित होते.

फोटो : ०४१२२०२०-आयएसएलएम-खरातवाडी न्यूज

खरातवाडी (ता. वाळवा) येथे धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश खरात, पृथ्वीराज खरात, भानुदास खरात, विष्णू खरात उपस्थित होते.

Web Title: Chiman Dange felicitated at Kharatwadi