इस्लामपूर येथे चिमण डांगे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST2020-12-24T04:24:51+5:302020-12-24T04:24:51+5:30

इस्लामपूर : संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ...

Chiman Dange felicitated at Islampur | इस्लामपूर येथे चिमण डांगे यांचा सत्कार

इस्लामपूर येथे चिमण डांगे यांचा सत्कार

इस्लामपूर : संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने संस्थापक, माजी नगरसेवक अशोकराव देसाई यांच्याहस्ते डांगे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन देसाई, उपाध्यक्ष भारत कदम, दत्तात्रय जाधव, जालिंदर कोळी, बाळासाहेब कोकाटे, तुकाराम नाळकर, धनंजय लोहार, अशोक गोरे, विशाल काळुगडे, भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते.

मनीष जाधव यांनी स्वागत केले. व्यवस्थापक जयंत देसाई यांनी संयोजन केले. कविता खोत यांनी आभार मानले.

फोटो : २३१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर सत्कार न्यूज

ओळ :

इस्लामपूर येथे किसान नागरी पतसंस्थेत अशोक देसाई यांच्याहस्ते अ‍ॅड. चिमण डांगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत देसाई, मनीष जाधव, जालिंदर कोळी, बाळासाहेब कोकाटे, धनंजय लोहार, तुकाराम नाळकर उपस्थित होते.

Web Title: Chiman Dange felicitated at Islampur