चिल्लरच्या आमिषाने साडेआठ हजाराला गंडा

By Admin | Updated: October 26, 2014 00:01 IST2014-10-26T00:01:54+5:302014-10-26T00:01:54+5:30

जतमधील घटना : व्यापाऱ्याला फसवले

Chillar's bait laughs eight and a half | चिल्लरच्या आमिषाने साडेआठ हजाराला गंडा

चिल्लरच्या आमिषाने साडेआठ हजाराला गंडा


जत : मंगळवार पेठेतील बिज्जरगी आॅईल मिलचे मालक अशोक बिज्जरगी यांना आठ हजार पाचशे रुपयांची चिल्लर देतो म्हणून अज्ञाताने गंडा घातला. याप्रकरणी त्यांचा मुलगा किरण बिज्जरगी यांनी जत पोलिसात तक्रार केली आहे.
चार दिवसांपूर्वी अज्ञाताने मोबाईलवरून संपर्क साधून माझ्याकडे आठ हजाराची चिल्लर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर जत एसटी बसस्थानकासमोरील समता चौकात कोणाला तरी पाठवून द्या, असे सांगितले. किरकोळ तेल आणि पेंड विक्री व्यवसाय करताना सतत चिल्लरची टंचाई जाणवते, त्यामुळे बिज्जरगी यांनी दुकानातील दिवाणजी शंकर सोलापुरे यांना आठ हजार रुपये घेऊन पाठविले. अज्ञात व्यक्ती त्यांच्या प्रतीक्षेत समता चौकात उभी होती. तुम्हाला बिज्जरगी यांनी पाठविले आहे काय, अशी त्यांनी विचारणा केली. दिवाणजीने ‘होय’ असे उत्तर दिले. किती पैसे आणले आहेत, अशी विचारणा करताच दिवाणजीने ‘आठ हजार’, असे सांगितले. त्यानंतर अज्ञाताने आपल्याजवळ आठ हजार पाचशे रुपयांची चिल्लर आहे, असे सांगताच त्यांनी परत जाऊन पाचशे रुपये आणले व अज्ञाताकडे दिले.
आपल्याकडे पाच हजाराची चिल्लर आणि साडेतीन हजाराच्या दहा रुपयांच्या नोटा आहेत, असे सांगून अज्ञाताने शंकर सोलापुरे यांना जयहिंद चौकालगत असलेल्या मनमंदिर बॅँकेच्या मुख्य दरवाजासमोर नेले. ‘तुम्ही येथेच बसा, आमच्या घरात कुत्रे आहे, ते तुम्हाला चावेल, तुमच्याजवळ असलेली पिशवी मला द्या, त्यात मी चिल्लर भरून आणतो,’ असे सांगून तेथून त्याने पोबारा केला.
बराच वेळ वाट पाहूनही अज्ञात व्यक्ती आली नाही म्हणून सोलापुरे यांनी बिज्जरगी यांना कळविले. त्यांनी त्या अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. (वार्ताहर)

Web Title: Chillar's bait laughs eight and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.