मौजे डिग्रजमध्ये मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: July 13, 2014 01:07 IST2014-07-13T01:01:02+5:302014-07-13T01:07:30+5:30

घटनेची रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद

Child's Suicide in Fun Degargas | मौजे डिग्रजमध्ये मुलाची आत्महत्या

मौजे डिग्रजमध्ये मुलाची आत्महत्या

सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील बसाप्पा गंगाराम पट्टलगी (वय १६) या शाळकरी मुलाने झाडाला गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली. आज (शनिवार) रात्री हा घटना घडली. घटनेची रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
बसाप्पा पट्टलगी याचे एकुंडी (ता. जत) मूळ गाव आहे. गेल्या काही वर्षापासून त्याचे कुटुंब मजुरीसाठी मौजे डिग्रजमध्ये वास्तव्यास आहे. बसाप्पा दहावीत शिकत आहे. आज सायंकाळी त्याने मौजे डिग्रज-नांद्रे रस्त्यावरील एका शेतातील झाडाला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना त्यांचा मृतदेह गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दाखल झाले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Child's Suicide in Fun Degargas