बालकांची आरोग्य तपासणी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:59+5:302021-04-25T04:26:59+5:30

भरधाव वाहनांवर कारवाई करा सांगली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक ...

The child's health check-up stopped | बालकांची आरोग्य तपासणी थांबली

बालकांची आरोग्य तपासणी थांबली

भरधाव वाहनांवर कारवाई करा

सांगली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रॉकेलअभावी ग्रामीण भागात अडचण

सांगली : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना रॉकेलचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र रॉकेल बंद झाल्याने दिवा कसा लावावा, असा प्रश्न आहे. गॅस मिळाला असला, तरी थंडीच्या दिवसात अनेकजण चुलीवर पाणी गरम करतात.

संचारबंदीतही नागरिक सुसाट

सांगली : जिल्ह्यात सोमवारपासून कडक संचारबंदी राज्य शासनाने जाहीर केली आहे. चौका-चौकात सकाळच्या टप्प्यात पोलीस दिसत आहेत. पण, दुपारनंतर पोलीसही फारसे कुठे रस्त्यावर दिसत नाहीत. विनाकारण दुपारी १२ नंतरही नागरिक बिनधास्त फिरत आहेत. पोलीस चौकात असले तरीही फिरणाऱ्यांना पोलीस विचारत नाहीत. यामुळे शहरातील रस्त्यावर नागरिकांची दिवसेंदिवस वावर वाढताना दिसत आहेत.

Web Title: The child's health check-up stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.