जिल्ह्यात बालदिन उपक्रमांनी साजरा

By Admin | Updated: November 16, 2014 23:49 IST2014-11-16T22:31:02+5:302014-11-16T23:49:15+5:30

सांगली : जिल्ह्यात बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

Children's activities are celebrated in the district | जिल्ह्यात बालदिन उपक्रमांनी साजरा

जिल्ह्यात बालदिन उपक्रमांनी साजरा

उमदी : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बालदिन साजरा करण्यात आला. नेहरूंच्या प्रतिमेला मुख्याध्यापक ए. एन. तरंगे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी माजी मुख्याध्यापक जी. एन. बिराजदार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक ए. एन. तरंगे यांनी आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर शाळेच्या संकल्पनेची माहिती दिली. यावेळी राजेंद्र कांबळे, एस. पी. अंगडी, ए. वाय. शिंदे, अनिता शिंदे, एस. ए. वाघमारे, डी. एम. काटे, ए. एन. साळे, एस. डी. शिवशरण उपस्थित होते. आभार सुभाष कोकळे यांनी आभार मानले.
मणेराजुरी : येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक ४४ व ४५ मध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक सुधीर बनसोडे व तलाठी विक्रम कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना तासगाव प्रकल्प, मणेराजुरी गावामध्ये अंगणवाडी सेविका महादेवी सुतार व शाकित सय्यद यांच्या सर्वेतील सर्व बालकांना सहभागी करून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनानिमित्त मुलांना खाऊ वाटप, रांगोळी स्पर्धा व पाककृती स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुंदर स्वच्छ परिसर याबद्दल माहिती दिली. यावेळी सेविका महादेवी सुतार, शाकित सय्यद, सुनीता भिसे, अर्चना कसबे व पदाधिकारी उपस्थित होते.
वाळवा : येथील गुरुवर्य लालासाहेब पाटील सार्वजनिक वाचनालयात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे वाळव्यातील नेते जयकर गावडे, तालुका एकात्मिक बालविकास योजना वाळव्याच्या सुपरवायझर सौ. बी. एस. जाधव यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अंगणवाडी क्र. ३0२, २९३ व ३0५ च्या बालकांना गुलाबपुष्प व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
अधिक इदाते यांनी स्वागत केले. महावीर होरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बशीर लांडगे, सचिव मिलिंद थोरात, माणिक शामराव पाटील, अंगणवाडी सेविका सौ. लता धनवडे, भारती माने, कमल कदम, वहिदा नाखेरकर, नीलम वाघमारे, शमीम जमादार उपस्थित होते.
सागाव : शिराळा तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने शिराळा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकात्मतेची प्रतिज्ञा घेतली. माजी जि. प. सदस्य के . डी. पाटील, सभापती चंद्रकांत पाटील, सुभाष पाटील, अभिजित पाटील, विशाल घोलप, धनाजी नरूटे, उत्तम गावडे, राजवर्धन देशमुख, अधिक चरापले, अभिजित यादव, सुरेश पाटील, सुशांत भक्ते उपस्थित होते. जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. सागाव येथे सभापती चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सत्यजित पाटील, सचिन गायकवाड, रंगराव पाटील, शिवाजी पाटील, रघुनाथ पवार उपस्थित होते.
शिरढोण : लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे बालदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य के. एन. शर्मा यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी फ ॅन्सी ड्रेस स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू, अण्णा हजारे, राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा आदींची वेशभूषा केली होती. लहान मुलांनी गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंविषयी विचार व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेत सोहम मोरे, आर्या कुंभार, शुभम माळी, वेदांती पाटील, अनुश्री माळी यांनी यश मिळविले. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा नूतन माळी, सचिव रामलिंग माळी, उपप्राचार्य शरदकुमार, रेजू रामचंद्रन आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

विद्यार्थ्यांना बँक पासबुकचे वितरण
मणेराजुरी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्यावतीने बाल दिनाचे औचित्य साधून महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूलमधील दहा वर्षावरील दोनशे शालेय विद्यार्थ्यांना सेव्हिंग्ज खात्याचे पासबुक देण्यात आले. पासबुकचे वितरण बॅँकेचे शाखाधिकारी व्ही. व्ही. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य व्ही. एम. पवार उपस्थित होते. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे १० वर्षावरील सर्व मुलांना बॅँक खाते काढणे जरूरी आहे. त्याची अंमलबजावणी करत मणेराजुरी शाखेने २०० विद्यार्थ्यांना पासबुकचे वितरण केले. यावेळी शाखेचे बी. सी. वाडकर, एस. एस. कांबळे, पी. डी. गौरकर, आर. एस. पाटील, ए. आर. शिंदे उपस्थित होते. संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Children's activities are celebrated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.