नोकरभरतीत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:57+5:302021-09-16T04:32:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र इमारत कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षित व ...

नोकरभरतीत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र इमारत कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षित व उच्चशिक्षित मुलांना कायम स्वरुपी नोकरभरतीसाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली.
संघटनेने कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ही मागणी केली असून, त्याबाबतचे निवेदन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, कामगार मंत्र्यांनी माथाडी मंडळाच्या नोकर भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राध्यान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यालय सुरू केले जात आहे. त्या ठिकाणी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या शिक्षित व उच्चक्षित मुलांना कायम नोकरीसाठी प्राधान्य द्यावे. त्यांची मंडळाच्या विविध पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक करावी आणि त्यांच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे, सचिव संजय संपत कांबळे, युवराज कांबळे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, सहदेव कांबळे, विक्रांत सादरे, संतोष माने, आंनदा गाडे, विक्रांत गायकवाड, वसंत गाडे, चंद्रकांत कांबळे, कुमार सुतार, राजू सय्यद, सुभाष पाटील, शिवकुमार वाली, ओंकार जाधव आदी उपस्थित होते.