शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: येळावीच्या फोंड्या माळावर पिकला ज्ञानाचा मळा, घडले १८ डॉक्टर ६ इंजिनिअर

By हणमंत पाटील | Updated: January 1, 2024 16:21 IST

येथील एका दानशूर व्यक्तींनी आपली स्वतःची पाच गुंठे जागा शैक्षणिक कामासाठी दान केली

उत्तम जानकर येळावी : एकेकाळी जेमतेम पंधरा ते वीस घरे असणारा वस्ती हा भाग. पडीवरली वस्ती हे तिचे नाव. पूर्वी या फोंड्या माळावर केवळ कुसळे उगवयाची. पण येथे येथील पाषाणाला पाझर फोडणारी माणसे जन्माला आली. ज्यानी माळाला कुसळे ही येणार नाहीत तिथे हाडाची काड करून मळा पिकवलाच. त्यासोबत ज्ञानाचाही मळा फुलविला. त्यामुळे येथे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १८ डॉक्टर, सहा इंजिनिअर, पाच सैनिक व घरटी एखादा शिक्षक आणि बरेच व्यावसायिक तयार झाले. ही सत्य कहाणी आहे तासगाव तालुक्यातील येळावी गावातील पडीवरली वस्तीची. एकेकाळी जनावराला चरायला चाराही येथे मिळायचा नाही. उत्पन्नाच साधन म्हणजे रोजगार, मजुरी, कष्ट आणि कष्ट. कारण या माळावरील वस्तीला निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून होती. शेतीला हक्काचं पाणी नसल्याने भुईमूग, तुरी, सूर्यफुल अशी जेमतेम उत्पादन देणारी पीक होत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले ते करून पाषाणाला पाजर फोडणारी माणसे याच माळाला जन्माला आली आणि हिरवागार शिवार केला. त्याचबरोबर ज्ञानाचा मळा फुलल्याने या वस्तीवर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा सूर्य उगवला. या वस्तीवरील त्या काळातील तरुणांनी काहींनी भाजीपाला व्यापार चालू केला, तर काहींनी पुण्या मुंबईची वाट धरली. काहींनी कसे बस खडतर प्रवास करत शिक्षण पूर्ण केलं व नोकरीच्या रूपाने प्रपंचाला हातभार लावला. येथील एका दानशूर व्यक्तींनी आपली स्वतःची पाच गुंठे जागा शैक्षणिक कामासाठी दान केली. या जागेवर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण सुरू झाले. येथील अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हा ,राज्यस्तरावर चमकले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, क्रीडा या विभागामध्ये आपल्या गुणाचा ठसा उमटवला. याच वस्ती वरील अनेक व्यक्ती सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवून आहेत. या फोंड्या माळावर फुललेल्या शिक्षणाच्या मळ्यात सतरा डॉक्टर, सहा इंजिनिअर, पाच सैनिक , शिक्षक आणि आणि व्यावसायिक निर्माण झाले.

टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षणdoctorडॉक्टर