मिरजेत कुत्र्याने लचके तोडल्याने बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:25+5:302020-12-12T04:42:25+5:30
मिरज शहरात भटकी कुत्री नागरिकांवर हल्ले करीत आहेत. बालके, वृद्ध व महिलांना त्यांचा त्रास होत आहे. शास्त्री चाैक परिसरात ...

मिरजेत कुत्र्याने लचके तोडल्याने बालक जखमी
मिरज शहरात भटकी कुत्री नागरिकांवर हल्ले करीत आहेत. बालके, वृद्ध व महिलांना त्यांचा त्रास होत आहे. शास्त्री चाैक परिसरात जन्नासाब दर्ग्याजवळ पाचवर्षीय फारुख बागवान हा बालक खेळत असताना, कुत्र्याने त्याच्या पायाचे लचके तोडून जखमी केले.
त्यामुळे भटकी कुत्री पकडून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नागरिकांच्या जीवितास होणारा धोका महापालिकेने टाळावा. महापालिकेने कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर महापालिकेच्या दालनात कुत्री सोडून निषेध व्यक्त करण्यात येईल. भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबविण्यात यावे व महापालिकेने कायमस्वरूपी जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले.
यावेळी भीम आर्मीचे जैलाब शेख, रिपाइंचे योगेंद्र कांबळे, विजय बल्लारी, रिपाइं मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, जमीर शेख आदी उपस्थित होते.