शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: करगणीत दोन मोटारींच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

By संतोष भिसे | Updated: April 6, 2024 16:26 IST

आटपाडी : भरधाव प्रवासी मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ...

आटपाडी : भरधाव प्रवासी मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.तौसिफ मुजावर (वय ६ वर्षे) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. समीर असिम मुजावर (वय ३२), त्यांची पत्नी वहिदा (वय २४), शकिला शब्बीर मुलाणी (वय ४०), शाहीद मुजावर (वय ९ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तौसिफ याचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले होते. त्याला उपचारांसाठी सांगलीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर आटपाडीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळेवाडी (ता. आटपाडी) येथील मुजावर कुटुंबीय बुधवारी रात्री मोटारीतून (एमएच ०६ एफ ८३२९) नेलकरंजी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर रात्री घरी परतत होते. करगणी येथे जिल्हा बँकेसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीला समोरून आलेल्या मोटारीने (एमएच ०९ एफव्ही ९०४५) जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटारीत पुढील बाजुस बसलेल्या दोन मुलांसह वडीलांना गंभीर इजा झाली. एका बालकाच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर गाडी उलटली. सर्व प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेने माळेवाडी गावावर शोककळा पसरली. वहिदा मुजावर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू